मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

ई-संजीवनी ओपीडीला उत्तम प्रतिसाद

राज्यभरातून 7000 रुग्णांनी घेतला लाभ

नवी मुंबई ः कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरु करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचा राज्यभरात 7000 रुग्णांनी लाभ घेतला आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध असुन मोठया प्रमाणावर रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. या सेवेद्वारे रुग्णांना विडियो कॉन्फरन्सिंगचा वापर करून थेट घरबसल्या वैद्यकीय अधिकार्‍यांशी आजाराबाबत सल्लामसलत करता येते. 

राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे मध्ये पूर्णपणे सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांसोबत संगणक, लॅपटॉप यांचा वापर करुन कुठल्याही आजारावर सल्ला मसलत करु शकतो. सदर सेवेमार्फत रुग्ण सर्व आजारांबाबत वैद्यकीय अधिकार्‍यांशी सवांद साधू शकतात. तसेच कोवीड 19 साथीच्या आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण जे घरी उपचार घेत आहेत किंवा विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांना देखील या सेवेचा लाभ होत आहे. किरकोळ आजाराच्या व्यक्तींना या सेवेचा उपयोग चांगल्या प्रकारे होत असुन प्रकृतीच्या छोटया मोठया कुरबुरींवर घरात बसुन डॉक्टरांशी सल्लामसलत करता येते. अनरॉईड ॅमोबाइल धारक गुगल प्ले मध्ये जाऊन देखील इ संजीवनी ओपीडी ऑनलाइन अ‍ॅप डाऊनलोड करू शकतात. यावर नोंदणी व आवश्यक माहिती भरल्यावर आपल्याला थेट डॉक्टरांशी संपर्क करुन दिला जातो व डॉक्टर-पेशंट थेट संवाद सुरु होतो. कन्सल्टींग झाल्यावर आजारावर औषधांचे ई प्रिस्क्रीप्शन देखील ऑनलाईनच उपलब्ध होते. केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत आणि दुपारी 3:00 ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे व रविवारी ओपीडी बंद असते. राज्यातील विविध ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांना ऑनलाईन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महानगरांमधून या ऑनलाईन ओपीडी सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • अशी आहे ई-संजीवनी ओपीडीची सेवा
    1. नोंदणी करुन टोकन घेणे- मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ओटीपी येतो. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो.
    2. लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटिफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळख क्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते.
    3. वेटिंग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच कॉल नाऊ हे बटन कार्यान्वित (क्टिव्हेट) होते. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांशी चर्चा केली जाते.
    4. चर्चेनंतर लगेच ई-प्रिस्क्रिप्शन प्राप्त होते.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट