मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्यात मास्कची किमंत निश्‍चित

मुंबई : कोरोना काळात हॅण्ड सॅनिटायझर आणि मास्क यांच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. त्याचा भूर्दंड सामान्यांना सोसावा लागत होता. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता शासनाने एका समितीची स्थापना केली होती. त्यानुसार राज्यात मास्कची किमत आता निश्‍चित करण्यात आली आहे. मास्कची किंमत 19 रुपये ते 127 रुपये असणार आहे.

मास्क, सॅनिटायझर यांच्या किमतीत पुन्हा वाढ झाल्याचं निदर्शनात आलं होतं. केंद्र शासनाच्या किमतीवरील नियंत्रणही 30 जून 2020 नंतर संपुष्टात आलं होतं. मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण यावे व सर्वसामान्यांना किफायतशीर किमंतीत मास्क मिळावे यासाठी शासनाने एका समितीची स्थापना केली होती. या समितीने मास्क उत्पादक कंपन्यांचा सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला. कच्चा माल, उत्पादन किंमत, उत्पादक, वितरक यांचा नफा यासर्व बाबींचा अभ्यास करुन समितीने किंमत निश्‍चित केल्या आहेत. यावरून उत्पादकाची उत्पाद किंमत, त्यावरील नफा तसेच प्रत्येकी वितरक व विक्रेता यांचा नफा गृहीत धरुन समितीने दर्जानुसार मास्कचे अधिकतम विक्री मुल्य प्रस्तावित केल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यानुसार राज्यात मास्कची (2 प्लाय, 3 प्लाय व एन 95) दर निश्‍चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता राज्यात मास्कची किंमत 19 रुपये ते 127 रुपये असणार आहे.

मास्कची किमत 

N-95 V shape मास्क - 19 रुपये
N-95 3D  मास्क - 25 रुपये
N-95 without valve मास्क- 28 रुपये
Magnum N-95 MH cup  मास्क - 49 रुपये
CN95+ N-95 cup shape मास्क विना वॉल्व- 29 रुपये
713W-N-95-6WE cup style मास्क विना वॉल्व- 37 रुपये
723W-N-95-6RE cup style मास्क विना वॉल्व- 29 रुपये
 FFP2 मास्क ; ISI सर्टिफाईड मास्क - 12 रुपये
2 Ply surgical with loop or tie मास्क- 3 रुपये
3 Ply surgical with Melt Blown मास्क - 4 रुपये
Doctors kit of 5 N-95 masks + 5 3Ply melt blown मास्क- 127 रुपये

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट