Breaking News
शैक्षणिक व ऐतिहासिक संस्कारांची सांगड! ; मांगवली प्रीमिअर लीगतर्फे ऐतिहासिक वह्यांचे वाटप
शिवरायांच्या गडकोटांची ओळख विद्यार्थ्यांपर्यंत
मुंबई - दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक विद्यालय, मांगवली येथे एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. मांगवली प्रीमिअर लीग च्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडांची माहिती देण्राया सुंदर व माहितीपूर्ण वह्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये मांगवली प्रीमिअर लीगचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे माजी विद्यार्थी - श्री. विजय गुरव, श्री. प्रसाद पांचाळ, श्री. प्रशांत राणे, श्री. अजय सुरेश राणे, श्री. विशाल आयरे, श्री. किरण आयरे, श्री. दीपक आयरे, श्री. अनिकेत संसारे व श्री. ऋषिकेश संसारे यांनी आपली उपस्थिती व सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कोकण विद्याप्रसारक मंडळ, शाळेचे शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा उपक्रम अधिकच यशस्वी ठरला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे