कुर्ला येथून महिलांचा देशभक्त कार्यक्रम - जवानांसाठी राख्या पाठवून दिले अभिवादन
रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर सुंदरबाग, कुर्ला पश्चिम येथील शिवाई महाजन हायस्कूल येथे महिलांच्या पुढाकाराने देशभक्तीपर राखी उपक्रम उत्साहात पार पडला. महिलांनी आणि विद्यार्थिनींनी आपल्या हस्तकलेने तयार केलेल्या राख्या विधिवत पूजा करून सीमेवर तैनात भारतीय जवानांना पाठवण्यात आल्या.
या उपक्रमात महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय होता. सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी सांगितले, देशाच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या वीर जवानांना आमच्या भावना, कृतज्ञता आणि आशीर्वाद या राखीच्या धाग्यातून पोहोचावेत, हीच आमची सदिच्छा आहे.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, सुप्रसिद्ध हास्य कलाकार भूषण कडू तसेच एड. दुर्गा पुजारी यांनी उपस्थिती लावली. त्यांनी महिलांच्या या अभिनव उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले आणि अशा उपक्रमांनी देशप्रेमाची भावना दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले.
या देशभक्तिपर कार्यक्रमाचे आयोजन संजीवनी सावंत आणि प्रदीप सावंत यांनी केले. कार्यक्रमाने उपस्थित सर्वांमध्ये देशासाठी योगदान देण्याची प्रेरणा निर्माण केली.
रिपोर्टर
गुरुदत्त वाकदेकर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर