Breaking News
नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस, धरणांमधून विसर्ग सुरू…
नाशिक – जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, दारणा, नांदूरमधमेश्वर आदी धरणांमधून टप्प्याटप्प्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कालपासून नाशिक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने गंगापूर धरण व गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार दोन दिवसापासून कायम आहे .
उद्या दि. २० जून रोजी सकाळी ६ वाजता गंगापूर धरण नदी पूर पाणी विसर्ग ५०० क्यूसेस ने सोडण्यात येणार असून सकाळी ९ वाजता १००० क्यूसेस करण्यात येईल तसेच धरणातल्या पाणी आवकानुसार विसर्ग टप्या टप्याने वाढवण्यात येईल, याची सर्वांनी काळीजपूर्वक नोंद घ्यावी आणि नागरिकांनी नदीपात्रातून बाहेर रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade