Breaking News
भात, तूर, कापूस यांसह 14 पिकांच्या MSP त वाढ
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने 2025-26 च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या 14 वाणांसाठी किमान आधारभूत किमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भाताच्या नवीन किमान आधारभूत किमतीचा दर २,३६९ रुपये निश्चित करण्यात आला आहे, जो मागील किमान आधारभूत किमतीपेक्षा ६९ रुपये जास्त आहे.
कापसाची नवीन किमान आधारभूत किंमत ७,७१० रुपये निश्चित करण्यात आली आहे. याच्या दुसऱ्या प्रकाराचा नवीन एमएसपी ८,११० रुपये करण्यात आला आहे, जो पूर्वीपेक्षा ५८९ रुपये जास्त आहे. नवीन एमएसपीमुळे सरकारवर २ लाख ७ हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल.
शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी किफायतशीर किंमत मिळावी या उद्देशाने सरकारने 2025-26 च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वृद्धी केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ कारळे (नायजरबियाणे) (प्रति क्विंटल 820 रुपये), त्यानंतर नाचणी (प्रति क्विंटल 596 रुपये), कापूस (प्रति क्विंटल 589 रुपये) आणि तीळ (प्रति क्विंटल 579 रुपये) करण्याची शिफारस केली आहे.
भाड्याने घेतलेले मानवी श्रमाची किंमत , बैल मजूरी/यंत्र कामगार, भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीचे भाडे, बियाणे, खते, सेंद्रिय खते, सिंचन शुल्क, अवजारे आणि शेतीच्या इमारतींवरील घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप संच चालविण्यासाठी डिझेल/वीज इत्यादी, विविध खर्च आणि कुटुंबाच्या श्रमाचे मूल्य, या सर्व चर्चांना विचारात घेऊन किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
वाढीव आधारभूत किंमतींचे तपशील जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वापरा.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे