मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

लोककलेतील भिष्मचार्य मधुकर नेराळे कालवश!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील तमाशासह लोककलेचा आधारवड ठरलेले आणि लोककलेत आपली भिष्मचार्य‌ म्हणून प्रतिमा उमटवून असणारे मधुकर नेराळे (८१) यांचे मुंबईत सोमवार २५ नोव्हेंबर २०२४ रोजी ह्रदय विकारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे आहेत. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण तमाशा, लोककलाभूमी शोकाकुल झाली. लालबाग चिवडा गल्लीतील न्यू हनुमान थिएटर एकाएकी पोरके झाल्याची भावना सर्वत्र पसरलेली दिसते.


नेराळे यांनी आयुष्यभर लोककलेच्या अस्तित्वासाठी स्वतःला वाहून घेतले. वडिलोपार्जित गिरणगावातील न्यू हनुमान थिएटरमध्ये १९६० पर्यंत पारंपरिक तमाशा कलेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. रोशन सातारकर, यमुनाबाई वाईकर, लिला गांधी ते अगदी मधु कांबीरकर पर्यंतच्या असंख्य कलावंताना 'न्यू हनुमान थिएटर' हे  आधारवड ठरले. त्यामुळेच या कलावंतांचे भाग्य उदयाला आले. तमाशा हा खरा लोककलेचा चेहरा, परंतु कलेच्या अत्याधुनिक काळात तो हरवत चालला होता. परंतु मधूकर नेराळे यांनी तमाशा कलेवर‌ राज्यभर परिषदा, शिबीरे,संमेलने घेऊन त्या कलेला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. त्यांनी अनेक कलावंत घडविले आणि लोककलेच्या संस्था स्थापनेला प्रोत्साहन दिले. १९६९ च्या सुमारास स्वतःची यशराज लोक नाट्य संस्था स्थापन करून वगसम्राट, गाढवाचे लग्न, आतुन कीर्तन बाहेरून तमाशा, राजकारण गेले चूलीत, उदं ग अंबे उदं, पुनवेची रात्र काजळी अशी एकापेक्षा एक संगीत लोकनाट्य कला रसिकांपुढे आणून कलावंतांमध्ये‌ नवा आत्मविश्वास रुजविला. तमाशा कलावंतांचा लोकाश्रय संपला तेव्हा त्यांना न्यू हनुमान थिएटरमध्ये आश्रय तर‌ दिलाच, पण सरकारी अनुदान मिळवून देण्यासही पुढाकार घेतला. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर पुरस्कार ते अगदी २०२३ पर्यंत जपान येथील राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पुरस्कारांपर्यंतचे शेकडो सन्मान म्हणजे त्यांच्या लोककलेतील समर्पित जीवनाची साक्ष ठरतात. त्यांच्या निधनाने असंख्य कलावंतामध्ये लोककलेतील वटवृक्ष उन्मळून पडल्याची भावना कलाविश्वात विखुरलेली दिसते. त्यांच्या अंत्ययात्रेला कलाक्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट