मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

*६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील मुंबई केंद्राचे शानदार उद्घाटन*


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित करित असलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे २४ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. सुप्रसिद्ध नेपथ्यकार तसेच रंगकर्मी सुनील देवळेकर, ज्येष्ठ रंगकर्मी तसेच साहित्य संघ मंदिरचे कार्यवाह सुभाष भागवत, साहित्यिक, पत्रकार, सुसंवादक गुरुदत्त वाकदेकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे  अधिकारी तसेच परीक्षक प्राची गडकरी, राम चव्हाण, सतिश पेंडसे यांच्या शुभहस्ते तसेच उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.  उद्घाटन  समारंभाचे सूत्रसंचालन अभिनेते विनय कांबळे यांनी केले. 


महाराष्ट्र शासनाने अविरत चालवेला रंगकर्मी घडविणारा हा यज्ञ यंदा ६३व्या वर्षात पदार्पण करत आहे. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे रंगकर्मींच्या कलागुणांचा सन्मान होणारी स्पर्धा घेतली जाते. केवळ १० रूपयांमध्ये वातानुकूलित सभागृहात हसवणार्‍या रडवणार्‍या समाज प्रबोधन करणार्‍या नाटकांची पर्वणी आपल्याला लाभली आहे. त्यामुळे येताना आपल्या सोबत किमान एका प्रेक्षकाला प्रत्येकाने घेऊन यावे आणि रंगकर्मींना दाद द्यावी, अशी कळकळीची विनंती गुरुदत्त वाकदेकर यांनी आपल्या मनोगतामधून केली. तसेच आयोजकांना आणि सर्व रंगकर्मीना स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी प्राथमिक फेरीमध्ये विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या फ्रिज महादेव या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. प्रेक्षकांनी प्रयोगाला हजेरी लावून कलाकारांना खूप छान दाद दिली.


स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई-१ केंद्रावर सुरू झाली असून ५ डिसेंबर पर्यंत या स्पर्धेमध्ये विविध १८ नाटकांचे प्रयोग होणार आहेत. स्पर्धेमध्ये सामाजिक समस्या, राजकीय विषय, प्रेमकथा आणि इतर विविध विषयांवर आधारित नाटके सादर करणार आहेत.


सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने विकास खारगे, (भा.प्र.से.) अपर मुख्य सचिव तसेच बिभीषण चवरे, संचालक यांनी हौशी कलाकारांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे. 

     तिकीट दर केवळ ₹१५/- आणि ₹१०/- आहे. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहेत. सदर स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच "रंगभूमी डॉट कॉम" ह्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकीट बुकींग करता येणार आहे. मुंबई केंद्राचे समन्वयक राकेश तळगावकर हे काम पाहत  आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट