Breaking News
''या'' चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने नवीन सरकारच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यानुसार वानखेडे स्टेडिअमवर शपथविधी होण्याची माहिती मिळत आहे. केवळ मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण एकीकडे विजयाचे शिल्पकार आणि सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्याने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी भाजपच्या गोटातून जोर पकडत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी शिंदेसेनेतून होत आहे. याबाबतचा निर्णय लवकरच होईल. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपला सर्वाधिक २२ ते २४, त्या खालोखाल शिवसेनेला १० ते १२ आणि अजित पवार गटाला ८ ते १० मंत्रीपदे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा होणं बाकी आहे. असं असतानाच या तिन्ही नेत्यांच्या संमतीने मंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित करुन तो वरिष्ठांना कळवला जाणार आहे.
मुख्यमंत्रिपदाबरोबरच मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाला वरिष्ठांनी होकार दिल्यानंतर कोणतं खातं कोणाला द्यायचं याबद्दलचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार, किती वर्षांसाठी, उपमुख्यमंत्री कोण होणार, या सर्वासाठीचा निर्णय उद्याच्या दिवसभरात चित्र स्पष्ट होईल.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची चर्चा असली तरी भाजपचं संख्याबळ जास्त असल्याने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील. पण भाजपचा धक्कातंत्राचा इतिहास पाहता, यावेळी मुख्यमंत्री करण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यात पूर्ण पाच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री असू शकतो किंवा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला किंवा दोन-दीड-दीड फॉर्म्युलाही असू शकतो.
विधीमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीतून दोन निरीक्षक पाठवले जाणार आहेत. केंद्रीय भाजपकडून दोन निरीक्षक राज्यात येणार आहेत. विधीमंडळ नेता निवडीनंतरच भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.
*मंत्रिमंडळात ''या'' २७ चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता*
भाजपमधून देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, राहुल कुल, नितेश राणे, चित्रा वाघ, प्रसाद लाड, किसन कथोरे
शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भुसे
राष्ट्रवादीकडून अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, छगन भुजबळ, धर्मरावबाबा अत्राम, अनिल पाटील
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर