मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

रामाचा वनवास बारा वर्षांचा, आदिवासींचा मात्र ३५ वर्षांचा

रामाचा वनवास बारा वर्षांचा, आदिवासींचा मात्र ३५ वर्षांचा

नंदुरबार - रामाने तर फक्त १२ वर्षाचा वनवास भोगला पण काँग्रेसचा निष्क्रिय आमदार निवडून दिल्याने अक्कलकुवा आणि धडगांव तालुक्यातील आदिवासी बांधव गेल्या ३५ वर्षांपासून वनवास भोगत आहे. हा वनवास संपवून या भागाचे नंदनवन करावयाचे असल्यास शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार जिल्हयातिल दुर्गम भागात असलेल्या धडगांव येथे केले. ते आज अनुसुचित जमातीसाठी आरक्षित अक्कालकुवा विधानसभा मतदारसंघातिल महायुतितिल शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांच्या प्रचार रॅलित बोलत होते.

त्यांनी माता देवमोगरा आणि आदिवासी वीर बिरसामुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आदिवासी बोलीभाषेतून भाषणाची सुरुवात केली. यावेळी भाजपा, शिवसेना तसेच राष्ट्रवादी पक्षांचे जिल्हयातिल पदाधिकारी उपस्थित होते. या भागाचा विकास करण्यासाठी या रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यासाठी या भागात एमायडिसी ची निर्मिती करुन मजुरांचे पुर्णपणे स्थलांतर रोखण्याचे प्रयत्न केले जातील.

दुर्गम भागात अद्यावत दवाखाने आणि रस्त्यांचे जाळे विणुन बांबुलंस पुर्णपणे हद्दपार करण्यात येईल, आचारसंहिता संपल्या नंतर लगेच धडगावला आणखी अँम्बुलंस देण्यात येतील.

नदिजोड प्रकल्प राबवून नर्मदेचे पाणी धडगांव तसेच मोलगी पर्यंत आणले जाईल, मोलगी शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात येईल असे अश्वासन देत मुख्यमंत्रयांनी आदिवासी जनतेसाठी शासन मोठ्या प्रमाणात योजना रावित असल्याचे सांगत विविध योजनांची माहिती दिली. विशेषकरुन लाडकी बहिण योजना, शेतीविज बिल माफ योजना, शेतकरिंना दिली जाणारी १२ हजारांची मदत, पिक विमा, सामान्यांना विजबिलात ३०% माफ या योजना आदिवासी भागाचा विकास करणार्या असल्याचे त्यांनी सांगितले.

सुमारे एक लाख महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ देऊन धडगांव तालुका दोन नंबरवर असल्याने मुख्यमंत्रयांनी तालुक्यातील पदाधिकारिंचे आभार मानले. अंगणवाडी सेविकांना १५ हजार मानधन देण्याचा निर्णय घेतला असून महिलांना लखपती बनवायचे आहे. डिसेंबर महिण्यात लाडकी बहिणचे पुढचे हप्ते खात्यात येतिल, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे विद्यमान आमदार निवडून आल्यानंतर मुंबईतच राहत असल्याने या भागाचा विकास झाला नाही असे आरोप करीत त्यांनी जमिनिवर राहणारा आमदार निवडून द्या असे आवाहन केले. मी सी. एम. म्हणजे काॅमनमॅन आहे. सामान्य माणसांना सुपरमॅन बनवायचे आहे असे सांगत रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत जनतेची सेवा करित राहणार असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात अक्कलकुवा तालुका एक नंबरचा विधानसभा मतदारसंघ आहे. आपण शिवसेनेचा आमदार निवडुन विजयाचा सिताफळ फोडा आम्ही हा मतदारसंघाला विकासाच्या बाबतित नंबर वन करू हा माझा शब्द आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पक्षाचा वचननामा जाहिर केला.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट