Breaking News
या फूटबॉलपटूने पटकावला Ballon d’Or 2024 हा मानाचा पुरस्कार
मुंबई - फुटबॉल जगतातील महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे बॅलोन डी’ओर. यंदाही या पुरस्कारासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली. यंदा रोनाल्डो आणि मेस्सीच्या वर्चस्वानंतर नव्या युगाची सुरुवात झाल्याचे दिसून आले. यंदा बॅलोन डी’ओर हा प्रतिष्ठित पुरस्कार युवा खेळाडूला मिळाला. स्पेनचा मिडफिल्डर रॉड्रिगो हर्नांडेझ कॅसकांटने शॅटलेट थिएटरमध्ये बॅलोन डी’ओर जिंकला. त्याला त्याचे चाहते रोड्री या नावाने ओळखतात.
रॉड्रिगो मँचेस्टर सिटीसाठी क्लब फुटबॉल खेळतो. 2024 च्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय संघ जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. यासह तो हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकणारा पहिला मँचेस्टर सिटी आणि तिसरा स्पॅनिश फुटबॉलपटू ठरला आहे. रॉड्रिच्या आधी लुईस सुआरेझ आणि अल्फ्रेडो डी स्टेफानो यांनी बॅलन डी’ओर जिंकला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar