मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

तिरुपतीचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांना आधार कार्ड अनिवार्य

तिरुपतीचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांना आधार कार्ड अनिवार्य

तिरुपती - देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानने व्यंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून लाडू घेण्यासाठी भाविकांना आधार कार्ड अनिवार्य केले आहे. देवस्थानचे ट्रस्टचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी वेंकैया चौधरी यांनी ही माहिती दिली.वेंकैया चौधरी म्हणाले की,काही दलाल मंडळी हे प्रसादाचे लाडू चढ्या भावाने भाविकांना विकत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.याला आळा घालण्यासाठीच आधारकार्ड अनिवार्य केले आहे.

प्रसादाच्या लाडू विक्रीसाठी विशेष काउंटर बनवण्यात आले आहे. काउंटर नंबर ४८ आणि ६२ वर हे लाडू मिळतील.दर्शनासाठी टोकन किंवा तिकीट असणारे भक्त पाहिल्याप्रमाणे एक मोफत लाडू मिळाल्यानंतर देखील अजून लाडू विकत घेऊ शकतात.मात्र ज्या भक्तांच्याजवळ दर्शन तिकीट आणि टोकन नाही,त्यांनी लाडूचा प्रसाद घेण्यासाठी आधारकार्ड दाखवणे आवश्यक राहील.

प्रसादाच्या लाडूच्या विक्रीसाठी विशेष काउंटर बनवण्यात आले आहे. काउंटर नंबर ४८ आणि ६२ वर हे लाडू मिळतील.दर्शनासाठी टोकन किंवा तिकीट असणारे भक्त पाहिल्याप्रमाणे एक मोफत लाडू मिळाल्यानंतर देखील अजून लाडू विकत घेऊ शकतात.मात्र ज्या भक्तांच्याजवळ दर्शन तिकीट आणि टोकन नाही,त्यांनी लाडूचा प्रसाद घेण्यासाठी आधारकार्ड दाखवणे आवश्यक राहील.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट