मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

लालबाग व्यापा-यांच्या साखळी उपोषणाला मनसे नेते बाळा नांदगावकरांची भेट

लालबाग व्यापा-यांच्या साखळी उपोषणाला

मनसे नेते बाळा नांदगावकरांची भेट

तोडगा काढण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत घेणार बैठक

( राजेंद्र साळसकर )

मुंबई- लालबाग परळ मधील फेरीवाल्यांच्या प्रश्नांंसाठी मनसे नेते  बाळा नांदगावकर  यांनी लालबाग मार्केट येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लवकरच त्यांच्या सर्व प्रश्नांवर तोडगा काढून त्यातून मार्ग काढण्याचे आश्वासन नांदगावकर यांनी उपोषणकर्त्यांना दिले. यावेळी शिवडी विधानसभा विभाग अध्यक्ष संतोष नलावडे,उपविभाग अध्यक्ष  चेतन पेडणेकर,नंदू घाडिगावकर, संतोष शिंदे ,प्रशांत पाटील,शाखाध्यक्ष निलेश इंदप,शरद राऊत आदि मनसे पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

संबंधित ४० दिवस प्रलंबित असलेल्या या विषयाला उपोषणाच्या पहिल्याच दिवशी श्री.बाळा नांदगांवकर यांनी काहीच तासात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ.सौ.अश्विनी जोशी,मुंबईचे पोलिस आयुक्त  विवेक फणसाळकर यांची संयुक्त बैठकीसाठी वेळ घेतली.  

    ४० दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येला मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या प्रयत्नामुळे लवकरच तोडगा निघून ही समस्या सुटण्यास मदत होईल अशी आशा येथील काही उपोषणकर्त्या व्यापा-यांनी व्यक्त केली.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट