Breaking News
आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव?
11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात
मुंबई : विधानपरिषदेच्या 11 जागासाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, प्राप्त मतांचा कोटया नुसार निवडून येण्यासाठी लागणारी मते महायुती सह महविकास आघाडीला कमी पडत आहेत. अपक्षा सह, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, एम आय एम यांची मते मिळविण्यासाठी भाजपा सह, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, अजित दादा चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी निकराचे प्रयत्न सुरु केले आहेत,आवश्यक मताचा कोटा पूर्ण करण्यासाठी व आपली हक्कची मते फुटू नयेत या उद्देशाने राजकीय पक्षानी आप आपल्या आमदारांना पुन्हा हॉटेल मध्ये ठेवण्याच्या हालचाली सुरु केल्या असून अपक्ष आमदारांना यनिमित्ताने पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे. 12 जुलै रोजी होणाऱया या निवडणुकीत भाजपा चे 5 शिवसेना 2 अजित दादा गट 2 काँग्रेस 1, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना 1 व राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 1 असे 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE