यंदा भाऊरायासाठी ‘खाद्यबंधन’

वडापाव,  समोसा तसेच रोपांची राखी उपलब्ध

नवी मुंबई : रक्षाबंधनांच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या राख्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्येही 5 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत राख्या विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजमाध्यमांसाठी वापरण्यात येणार्‍या ऍपचा वापर करून राख्या बनविण्यात आल्या आहेत. राज्यातील पारंपरिक धागा आणि गोंड्याच्या राख्यांसह विविध खाद्य पदार्थ, फेसबुक, कार्टून, देवादिकांच्या राख्या विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेने राख्यांचे प्रकार वाढले असून ग्राहकांची मागणी वाढली आहे.

या सणालाही महागाईचा फटका बसला असून राख्या महागल्या आहेत. नवनवीन प्रकारच्या राख्या बाजारात आकर्षित करत असल्या तरी गतवर्षीच्या तुलनेत 25 ते 50 टक्क्यांनी राख्या महाग झाल्याचे सांगण्यात येत आहे. गतवर्षी 10 ते 15 रुपयांना मिळालेली राखी यंदा 20 ते 25 रुपयांवर गेली आहे. बाजारपेठेत पारंपरिक गोंड्याच्या राखी ऐवजी डोरेमन, छोटा भीम, लायटिंगच्या राख्यांची क्रेझ असली तरी त्या तुलनेत पैसेही मोजावे लागत आहेत. याशिवाय रेशीम धागे आणि चंदन राख्या, मोती, रुद्राक्षच्या सुंदर आणि आकर्षक राख्यांसह अनेक रंग आणि डिझाईनमध्ये राख्यांचे असंख्य प्रकार बाजारात दिसून येत आहेत. सराफा बाजारातही चांदी आणि सोन्याचा मुलामा दिलेल्या राख्या उपलब्ध आहेत. तर काही बहिणींनी आपल्या भावासाठी ब्रेसलेटसारख्या राख्यांची खरेदी केली आहे.

  • ऑनलाईन राखीही उपलब्ध
    पूर्वीच्या काळी बाजारपेठेतील दुकाने पालथी घालून लाडक्या भावासाठी बहिण मनासारखी राखी मिळेपर्यंत पायपीट करीत होती. आता ऑनलाइनच्या जमान्यातील बाजारपेठही व्यापक झाली असून खडे, मोती, गोंडा, रेशीम धागा, प्लॅस्टिकची फुले, मॉडर्न डिझाईन आणि मॉडर्न लुक असलेल्या असंख्य राख्या ऑनलाईन बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मोरपीस, अमेरिकन डायमंड, चांदी, गोल्ड प्लेटेड, वुडन आदी अनेक प्रकाराच्या 200 रुपयांपासून 3 हजार आणि यापेक्षाही अधिक किमतीच्या राख्या बाजारपेठेत मिळत आहेत.

रिपोर्टर

  • Devendra Ahirwar
    Devendra Ahirwar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Devendra Ahirwar

संबंधित पोस्ट